Ad will apear here
Next
‘स्वेरी’मध्ये शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

सोलापूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी) संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १४५वी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. या वेळी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

या नंतर आयोजित कार्यक्रमात शाहू महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकताना एमबीएचे विभागप्रमुख प्रा. करण पाटील म्हणाले, ‘शाहू महाराजांनी शेतकऱ्यांसाठी स्वस्त दराने गवत मिळण्यापासून ते गोठ्याच्या सोईपर्यंत सर्व कार्यांना गती दिली. बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून विहिरीचे खोदकामे, तलाव, रस्ते, कालव्यांची कामे काढली. गरिबांच्या घरी दुष्काळात गरजेच्या साहित्याचे वाटप, अनाथ, अपंग, वृद्ध व निराधार लोकांसाठी अन्नछत्रेदेखील काढली. व्याकुळ झालेली लहान मुलेदेखील राजांच्या नजरेतून सुटली नाहीत. त्यांच्यासाठी पाळणाघराची व्यवस्था केली. नागरिकांचे जीवन सुरक्षित राहण्यासाठी राजांनी जीवाचे रान करून सर्व प्रकारच्या सोयीसुविधा केल्या.’

‘शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाच्या प्रसाराची त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इसवी सन १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली,’ असे प्रा. पाटील यांनी सांगितले.

या प्रसंगी संस्थेचे संस्थापक सचिव व इंजिनीअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वेरी’चे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार, डॉ. धनंजय चौधरी, डॉ. संताजी पवार, डॉ. रंगनाथ हरीदार, प्रा. अमोल चौंडे, प्रा. शेख, प्रा. पंकज गायकवाड, प्रा. सचिन भोसले, नागेश ताडे, योगेश कदम यांच्यासह इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZFZCB
Similar Posts
‘स्वेरी’मध्ये शिक्षक दिन साजरा सोलापूर : ‘शिक्षक ही अशी व्यक्ती आहे, जी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सतत त्याग करत असते,’ असे प्रतिपादन अॅटलास कोपको इंडिया लिमिटेडचे कॉर्पोरेट मनुष्यबळ व्यवस्थापक कबीर गायकवाड यांनी शिक्षक दिनी केले. गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटतर्फे संचलित अभियांत्रिकी
‘स्वेरी’तर्फे पंढरपुरात येणाऱ्यांसाठी शुद्ध पाणी वाटप सोलापूर : आषाढी वारीसाठी पंढरपुरात आलेल्या वारकऱ्यांना शुद्ध पाणी देण्याचे उत्तम कार्य श्री विठ्ठल एज्युकेशन अॅंड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी) करत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यअधिकारी प्रा. श्रीकांत भारतीय यांनी पंढरपूर येथे केले.
‘टेक्नोसोसायटल– २०१८’ तंत्रपरिषदेचे पंढरपुरात आयोजन पंढरपूर : ‘‘टेक्नोसोसायटल-२०१८’ या आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषदेचे येत्या १४ आणि १५ डिसेंबर २०१८ या दोन दिवशी पंढरपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये (स्वेरी) आयोजन करण्यात आले आहे. देशातून आणि परदेशातूनही अनेक संशोधक, शास्त्रज्ञ या परिषदेला उपस्थित राहणार आहेत,’ अशी माहिती संस्थेचे
‘स्वेरी’च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नऊ डिसेंबरला पुण्यात सोलापूर : ‘पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅंड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी) संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे ‘ऋणानुबंध २०१८’ या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मेळाव्याचे आयोजन या वर्षी पुण्यातील कोथरूड येथे करण्यात आले आहे. हा मेळावा नऊ डिसेंबरला होईल,’

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language